आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद आरक्षणाचा : शरद पवारांनी समज दिली नसल्याचा मेटेंचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला शब्द पाळला नसल्यानेच त्यांच्याबद्दल मी नाशिकमध्ये नाराजी व्यक्त केली होती. ती आजही कायम आहे. मात्र, या प्रकरणावरून मला पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कोणतीही समज वगैरे दिलेली नाही,’ असा खुलासा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

‘बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मी काहीच वाईट बोललो नव्हतो. मराठा आरक्षणाबाबत भूमिकेला माझा पाठिंबा आहे. या संघर्षात मी तुमच्या सोबतच नव्हे तर दोन पावले पुढेच राहीन,’ अशी भूमिका भुजबळांनी गेल्या निवडणुकीच्या प्रचारात घेतली होती. मात्र, नंतर पुढे त्यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणतीही कृती झाली नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मराठा समाजात रोषच आहे,’ असे मेटे यांनी स्पष्ट केले.

आर्थिक निकर्षाच्या निर्णयाचे स्वागतच
मराठ्यांसह इतर समाजातील आर्थिक दुबर्लांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा, या पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. शिवसंग्राम संघटनेने ही भूमिका पूर्वीच घेतली आहे. मात्र, इतर समाजांना कोणत्या वर्गातून किती आरक्षण द्यायचे यासंबंधीची भूमिका त्या-त्या समाजातील धुरीणांनी घ्यावी, असे आमदार मेटे म्हणाले.

‘ओबीसीं’चे आरक्षण 25 टक्क्यांनी वाढवा
आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. ‘ओबीसी’त समावेश केल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. त्यांचे आरक्षण कायम ठेवून मराठ्यांसाठी नवे 25 टक्के आरक्षण ओबीसींमध्ये निर्माण केले पाहिजे. राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकते. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे,’ असे मेटे म्हणाले.

‘राणे समितीकडे भक्कम पुरावे सादर
मराठा आरक्षणासंदर्भातील समाजाची मते जाणून घेण्यासाठी नारायण राणे यांची समिती 17 ऑगस्टला पुण्यात येत आहे. जास्तीत जास्त मराठ्यांनी ओबीसी असल्याचे कागदोपत्री पुरावे या समितीकडे सादर करावेत, असे आवाहन करतानाच मागासवर्गीय आयोगातून हरी नरके यांच्यासारख्या जातीयवाद्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही मेटे यांनी केली.