आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नगरसेवकावर मराठी अभिनेत्रीची फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दत्तवाडी पोलिस चौकीत काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री स्मिता गोंदकरने नगरसेवक सिद्धार्थ बांठियावर लग्नाचे नाटक करुन दीड वर्ष पैसे उकळल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासात स्मिताने केलेले आरोप खरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून त्यांनी सिद्धार्थ विरोधात फसवणूक आणि एक वर्षांहून जास्तकाळ बलात्कार केल्याचा गन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री स्मिताने पनवेलचा काँग्रसचा नगरसेवक सिद्धार्थवर गंभीर आरोप केले होते. सिद्धार्थचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. असे असतान त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याची खोटी कागदपत्रे दाखवून स्मिताशी लग्न केले आणि तिचे लैंगिक शोषण करत होता. स्मिताने आरोप केला होता की, फ्लॅट विकत घेण्याच्या बहाण्याने त्याने लाखो रुपये हडप केले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्मिताने केलेले आरोप खरे ठरले आहेत. महिला साहाय्य कक्षाच्या पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले की, लग्नाची सीडी, पहिल्या बायकोच्या घटस्फोटाची बनावट कागदपत्रे, लग्नाचे बनावट नोंदणीपत्र ताब्यात घेतले आहे.