आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Author Shripal Sabnis Slams Modi Over 2002 Riots

...तर पाडगावकरांआधी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे मरायचीच लक्षणे होती. कोणत्याही क्षणी गोळी लागू शकली असती. किंवा बॉम्बगोळा पडू शकला असता. असा अनर्थ घडला असता तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपला असता आणि मंगेश पाडगावकरांच्या आधी आपल्याला मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती, असे वक्तव्य ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. सबनीसांनी तोल सोडून विधाने केल्याने सर्वच अचंबित झाले. आकुर्डीतील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद‌्‌्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणावर विचार ‘प्रकट’ करण्याची सबनीसांची 'प्रगल्भ'ता पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण भाषणात सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांचा वारंवार एकेरी उल्लेख केला.

गोध्रा हत्याकांडातील मोदी कलंकित मोदी होता. माझ्या मते तो लायकीचा पंतप्रधान नाही. उत्तरार्धातले नरेंद्र मोदी मात्र बदललेले आणि दहशतवाद नष्ट करण्यासाठी धडपडणारे असल्याने ते खऱ्या अर्थाने पंतप्रधान आहेत. मात्र हे करताना सगळीकडे फिरणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. कोणत्याही क्षणी गोळी लागली असती किंवा बॉम्बगोळा पडू शकला असता. हा अनर्थ घडला असता तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपला असता आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच मोदीची शोकसभा घ्यावी लागली असती, असे सबनीस म्हणाले.

संघर्षाच्या जागा असल्याच पाहिजेत. आता आपण संवादाकडे वळले पाहिजे. पाकिस्तानच्या गुलाम अलीला भारतात येऊ द्या, त्याला येथे गाऊ द्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पंतप्रधान काबूलवरून अचानक पाकिस्तानात जातो. त्यांना नवाज शरीफचा पुळका आला नव्हता, तर राष्ट्राचा पुळका आला होता. कारण उत्तरार्धातील म्हणजे आजचा मोदी गांधींचे, बुद्धाचे नाव घेतो. जगातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी तो पुढाकार घेतो आणि ३० मुस्लीम राष्ट्रांची मोट बांधतो. अमेरिका, चीनशी मैत्री करतो, ही चांगली गोष्ट आहे. पण हा पंतप्रधान नवाज शरीफच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हातावर शीर घेऊन गेला. कारण, दाऊद पाकिस्तानात आहे. दहशतवाद्यांचे अनेक अड्डे तिथे आहेत. नरेंद्र मोदी एका दिवसात संपला असता. एवढे समर्पण करणारा हा माणूस आहे. त्याचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद साधला पाहिजे, असे सबनीस म्हणाले.