आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माध्यमाच्या मुलांनाच आजी-आजोबांचा लळा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांपेक्षा मराठी माध्यमाच्या मुलांना आजी-आजोबांचा जास्त सहवास मिळतो. मराठी शाळांतील मुले अधिक कुटुंबवत्सल वातावरणात वाढतात. याउलट इंग्रजी शाळांमधल्या बहुतांश मुलांच्या आजी-आजोबांच्या वाट्याला म्हातारपणातला एकटेपणा आलेला आहे. पालकांची सुधारती आर्थिक स्थिती आणि इंग्रजी शाळांमध्येच पाल्यांना शिकवण्याचा वाढता सोस यामुळे कुटुंबव्यवस्था कोणत्या दिशेला चालली आहे, यावर प्रकाश टाकणारे हे निष्कर्ष पुण्यातल्या 22 शाळांमधल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर मिळाले आहेत.

कुटुंबांची रचना बदलली आहे का, घरातील ज्येष्ठांची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटने ‘र्शावणबाळ’ हा प्रकल्प हाती घेतला होता. ‘सिंबायोसिस’मध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे धडे गिरवणार्‍या विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण केले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकणार्‍या व 9 ते 14 वर्षे वयोगटातल्या कोवळ्या मुलांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या.

एकूण 22 शाळांमध्ये सर्वेक्षण
पुण्यातील प्रसिद्ध सात मराठी शाळा आणि 15 इंग्रजी शाळांची निवड या सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा, ज्ञानप्रबोधिनी आदी मराठी माध्यमातल्या आणि सेंट विन्सेंट स्कूल, सेंट जॉन्स हायस्कूल, लॉयला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट नॅन्सी स्कूल, डॅफोडिल्स इंटरनॅशनल स्कूल, सिंबायोसिस प्रायमरी स्कूल आदी इंग्रजी आदी शाळांमधल्या मुलांकडून माहिती गोळा करण्यात आली.

मराठी कुटुंबांत मूल्यांना महत्त्व
‘सिंबायोसिस’ संस्थेचे संचालक डॉ. विवेक साने यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘मराठी शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या कुटुंबांमध्ये भारतीय मूल्यांना अधिक महत्त्व दिले जाते. ज्येष्ठांची काळजी घेण्याची भावना मराठमोळ्या घरांमध्ये अधिक आहे, असे मुलांशी बोलल्यानंतर लक्षात आले.’