पेशवा बाजीरावने मराठी सत्तेचा भगवा महाराष्ट्राबाहेर नेत अतिशय सामर्थ्यवान समजल्या जाणाऱ्या मोगली सत्तेसमोर जबर आव्हान उभे केले होते. मोगली सत्तेचा वजीर आणि अनुभवी सेनानी निझामाला नाक धरुन शरण यायला लावले होते. स्वकियांचा विरोध मोडून काढत नेतृत्व सिद्ध केले होते. बाजीराव कायम शत्रुपक्षाच्या कच्च्या दुव्यांच्या शोधात राहायचा. संधी मिळताच जोरदार हल्ला चढवायचा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या संकल्पनेचा पुरस्कार करणारा होता. झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुळावर घाव घालणारा होता.
बाजीराव पेशवाचे सैन्य अतिशय विद्युत गतीने मार्गक्रमण करीत शत्रूच्या उरात धडकी भरवायचे. अशाच पद्धतीने त्याने भोपाळच्या युद्धात मोगलांचा दारुण पराभव केला होता. पालखेडला निझामाची कोंडी करुन त्याला नाक धरुन शरण यायला लावले होते. पोर्तुगीजांना नमवून आंग्रेंना वठणीवर आणले होते. त्याच्या युद्धकौशल्याचे आजही कौतुक केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्शस्थानी ठेवून बुंदेलखंडात महाराजा छत्रसालने साम्राज्य स्थापन केले होते. त्याला वेळीच मदत करुन बाजीराव पेशवाने बुंदेल्यांसह राजपुतांची मने जिंकली होती. त्यानंतर त्याच्या पगडीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, पेशवा बाजीराव कसा काय होता असामान्य व्यक्तिमत्त्वाचा धनी...साम्राज्यवादाचा होता पुरस्कर्ता...
सौजन्य- मराठ्यांचा इतिहास, लेखक- प्रा. मदन मार्डीकर