आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Language Department Give Extension To Committee

मराठी भाषा विभागच देताे समितीला मुदतवाढ, भाषा संचालनालयाचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्याचे भाषाविषयक धोरण पुढील २५ वर्षांत काय व कसे असावे, याविषयी नेमण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीला मुदतवाढ मराठी भाषा विभागाकडून दिली जाते. भाषा संचालनालयाचा समितीला मुदतवाढ देण्यात सहभाग नसतो, असे स्पष्टीकरण राज्याच्या भाषा संचालनालयाच्या वतीने देण्यात आले आहे.

‘भाषा सल्लागार समितीला ११ दिवसांची मुदतवाढ’, या ‘दिव्य मराठी’त २८ जुलैला प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी हे स्पष्टीकरण दिले अाहे. तसेच याच बातमीत मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गावडे यांच्या नावाचा व पदाचा अनवधानाने अयोग्य उल्लेख झाला आहे. ताे ‘अपर्णा गावडे’ असा दुरुस्त वाचावा.