आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठीला अभिजात दर्जा, आठवडाभरात घाेषणा? सांस्कृतिक मंत्रालयाची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गेली वीस वर्षे सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी अभिजाततेच्या अहवालाला मान्यता दिली आहे. आता हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी मेअखेरपर्यंत मराठीला हा दर्जा मिळण्याची शक्यता बोलून दाखवली."शुक्रवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शर्मा यांनी पठारे समितीच्या अहवालास मान्यता दिली. दरम्यान न्यायालयात आणखी एका भाषेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र, या भाषेचा संबंध मराठीला अभिजात दर्जा देण्याशी येत नाही. त्यामुळे मराठीला दर्जा देण्याची अनुमती मिळावी, असे प्रतिज्ञापत्र केंद्राच्या वतीने सादर केले जाणार आहे. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास अडचण नाही,’असे नरके म्हणाले. तामीळ, कन्नड, तेलगू व ओरिया या भाषांना यापूर्वीच अभिजात दर्जा मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...