आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Literary Festival Begins In Pimpri Chinchwad Today

Photos: मराठमोळ्या ग्रंथदिंडीने साहित्‍य संमेलनाच्‍या सोहळ्याला दमदार सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांच्यासोबत फुगडी खेळताना किर्तनकार रामचंद्र देखणे. - Divya Marathi
स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांच्यासोबत फुगडी खेळताना किर्तनकार रामचंद्र देखणे.
सर्व छायाचित्रे -पीयूष नाशिककर
पुणे- मकर संक्रातीच्या गोड सणासोबत मायमराठी भाषेतील साहित्यगोडी निर्माण करणार्‍या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी आता सज्ज झाली आहे. दुपारी 4 वाजता दिमाखदार ग्रंथदिंडीने साहित्‍यसंमेलनाला सुरूवात झाली. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या नऊ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. पारंपरिक वेशातील महिलांनी दिंडीत विविध खेळ सादर केले.
पिपरीमधील हिंदुस्थान ऍण्टिबायोटिक्स कंपनीच्या 40 एकराच्या मैदानावर आता संमेलनाचा भव्य मंडप मोठ्या दिमाखात उभा राहिला असून साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी तयार झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात संमेलनाचे निमंत्रण देणा-या कमानी, भव्य फलक लावल्याने संपूर्ण शहर साहित्यमय झाले आहे.
ग्रंथदिंडीत सुमारे 10 हजार लोकांचा सहभाग..
- ग्रंथदिंडीच्या समन्वयक मृदुल महाजन यांनी याविषयी माहिती दिली.
- दुपारी चार वाजता पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरूवात.
- ग्रंथदिंडीने मुंबई- पुणे महामार्गावरून संत तुकारामनगरमार्गे मार्गक्रमणा केली.
- ग्रंथदिंडीच्या गर्दीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बाहेर वाहतूक कोंडी
काय होते ग्रंथदिंडीत...
- पालखीत संतगाथा, फुले-आंबेडकर आणि आण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ, राज्‍यघटनेचे पुजन झाले.
- ग्रंथदिंडीमध्ये दोन हजार महिला पारंपरिक पोषाखात सहभागी झाल्‍या होत्‍या.
- लेझीम, ढोल-ताशा, झांज पथके, ध्वजपथके दिंडीच्या समवेत प्रात्यक्षिके करत होती.
- दिंडीत शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकऱ्यांनी रिंगण केले.
- साहित्यिक, रसिक आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिक मिळून सुमारे 10 हजार साहित्यप्रेमी दिंडीत सहभागी होते.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षता-
ग्रंथदिंडीचा मार्ग तसेच संमेलनस्थळाची सुरक्षितता व वाहतुक या दृष्टीने सहाय्यक पोलिस आयुक्त महेंद्र रोकडे आणि भीमराव गजरे यांनी पाहणी केली. रोडके म्हणाले की, ग्रंथदिंडी चालू असताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पिंपरी भागात गर्दीच्या किमान 16 ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात येतील. तसेच महत्त्वाच्या आणि अती महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या वाहने लावण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, ग्रंथदिंडीचे फोटो..