आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Man Not Recognise Importantance Of Dignataries, Home Minister Said

पाय खेचणे हा मराठी मातीला शाप,गृहमंत्र्यांचा आठवलेंना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - खूप मोठी माणसं जन्माला घालण्याच वरदान महाराष्ट्राला आहे. पण मोठय़ा माणसांची किंमत त्यांच्या हयातीत न कळल्याने त्यांची पाठराखण न करता पाय खेचणे हा महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला शाप आहे. आम्हाला दिल्लीत अपमानित व्हावे लागले. आजही महाराष्ट्र अवमानित का होतोय, अशी खंतवजा सवाल करत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत दाखल झालेल्या रामदास आठवले यांना इतिहासापासून बोध घेण्याचा सल्ला दिला. दौंड (जि. पुणे) येथे सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार दिलीप गांधी, गजानन कीर्तिकर, शिवसेना आमदार विजय शिवतारे, रामदास आठवले, महादेव जानकर, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होती. औरंगाबादचे शिल्पकार सुनील देवरे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मोगल-निझामशाहीची अनेक राज्ये अस्तित्वात होती, परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याला कधी भोसले राज्य म्हटलं नाही, तर रयतेच राज्य असा इतिहास आहे. राजांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याचा प्रयत्न केला नाही. जाती सलोख्याचा आदर्श महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले.
आठवलेंचा ‘चारोळी टोला’
आठवलेंनी व्यासपीठावरच चारोळी रचत अजित पवार व आर. आर. पाटलांना टोला लगावला.
आम्ही आता राहिलो नाही बावळे,
म्हणून आमच्यासोबत कुणीच फिरकत नाही कावळे
महाराजांच्या मदरुमकीचे आम्ही वाचले पान अन् पान
म्हणूनच अजितदादा, आबा मराठय़ांना आरक्षण देण्याकडे द्या तुम्ही ध्यान