आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Natya Sammelan Location Decided On Sunday Meeting

मराठी नाट्यसंमेलनाचे स्थळ रविवारच्या बैठकीत ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आगामी नाट्यसंमेलन कुठे भरणार, या प्रश्नाचे उत्तर रविवारी (4 ऑगस्ट) रसिकांना मिळेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक रविवारी पिंपरीत होत असून त्यात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.


ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला नव्या संमेलनस्थळाची निवड करायची आहे. आगामी नाट्यसंमेलनासाठी नाट्य परिषदेच्या सातारा, नागपूर, कराड आणि नाशिक अशा चार शाखांकडून निमंत्रणे आली आहेत. नियामक मंडळाच्या बैठकीत या चारपैकी एका स्थळावर पसंतीचा शिक्का मारला जाईल.


उपाध्यक्षपद वादात
नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले प्रमोद भुसारी हे नागपूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. भुसारी यांनी नाट्य परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वी येथील जिल्हाधिका-यांची लेखी परवानगी घेतली नव्हती, ही बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिका-याला असे पद भूषवता येते का, असा प्रश्न विचारला जात आहे. बैठकीत हा प्रश्नही उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.