आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : इंजिनिअर पतीने डॉक्‍टर पत्‍नीच्या डोक्यात झाडली गोळी, चारित्र्यावर होता संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अंजली - Divya Marathi
मृत अंजली
पुणे - चारित्र्याच्या संशयावरुन एका कॉम्‍प्‍युटर इंजिनिअरने आपल्‍या डॉक्‍टर पत्‍नीचा तिच्‍याच क्‍लीनिकमध्‍ये तीन वर्षांच्‍या मुलासमोर कपाळावर गोळी मारून खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री वाकडगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. डॉ. अंजली पाटीदार (34) असे मृताचे तर मनोज पाटीदार असे आरोपीचे नाव आहे.
मुलामुळे उघड झाला खून
> वडिलांनी आईचा खून केल्‍यानंतर तीन वर्षांचा मुलगा क्‍लीनिक बाहेर येऊन जोरजोरात रडत होता.
> त्‍यामुळे शेजाऱ्याच्‍या दुकानदाराने त्‍याच्‍या जवळ जाऊन विचारणा केली.
> त्‍यानंतर हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला.
> त्‍यावर त्‍या दुकानदाराने तत्‍काळ पोलिसांना माहिती दिली.
असे पकडले पोलिसांनी
> पत्‍नीचा खून केल्‍यानंतर मनोज हा आपल्‍या चारचाकीने पळून जात होता.
> तो कुठल्‍या दिशेने गेला याची माहिती शेजारच्‍या दुकानदाराने दिली.
> पोलिसांनी सिनेस्‍टाइल त्‍याचा पाठलाग केला.
> कात्रज घाटाजवळ त्‍याच्‍या गाडीचा टायर फुटला. त्‍यामुळे पोलिस त्‍याला पकडू शकले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आरोपीचे आहे तिसरे लग्‍न, यापूर्वीच्‍या दोन बायकांचाही संशयास्‍पद मृत्‍यू... बुधवारी रात्री नेमके काय झाले ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...