आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यातील पोलिस दाम्‍पत्‍याने पोलिस दलासह महाराष्‍ट्रालाही बनवले \'उल्‍लू\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील पोलिस दलात कार्यरत असलेले तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या दाम्‍पत्‍याने माऊण्ट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्‍याचा दावा केला होता. असा विक्रम करणारे देशातील पहिले जोडपे म्‍हणून संपूर्ण महाराष्‍ट्रात त्‍यांचे कौतुकही झाले होते. परंतु, त्‍यांनी फोटोशॉपच्‍या माध्‍यमातून ही कमाल केली असल्‍याचा आरोप होत असून, यातून त्‍यांनी केवळ पोलिस दलाचीच नाही तर संपूर्ण महाराष्‍ट्राची फसवणूक केल्‍याचे म्‍हटले जात आहे.
पोलिस आयुक्‍तांनी दिले चौकशीचे आदेश
> चार गिर्हारोहकांनी या बाबत पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार दिली.
> त्‍या आधारे आयुक्‍तांनी चौकशीचे आदेश दिले.
आयुक्‍तांकडे सोपवले मूळ फोटो
> तक्रारकर्त्‍यांनी पोलिस आयुक्‍तांकडे मूळ फोटो सोपवले आहेत.
> राठोड दाम्‍पत्‍याने या फोटोमध्‍ये छेडछाड करून आपण एव्हरेस्ट सर केले, असे भासवल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.

राठोड दाम्‍पत्‍याने काय केला होता दावा

> राठोड दाम्‍पत्‍याने 5 जून रोजी काठमांडू येथे एका पत्रकार परिषदेत दावा केला होता की, आम्‍ही 23 मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले.
> पत्रकार परिषदेमध्‍ये त्‍यांनी याचा पुरावा म्‍हणून अनेक फोटो आणि काही सर्टिफिकेटही दाखवले होते.
> त्‍या नंतर पुण्‍यात आल्‍यानंतर पोलिस दलाने त्‍यांचा सत्‍कारही केला होता.
का बळावला संशय ?
> गिर्यारोहक प्रेमी संस्‍थेशी निगडित असलेले उमेश जिरपे यांनी सांगितले, "कुणी एव्हरेस्टवर चढाई करत असेल तर या अभियानाशी सर्व लोकांना या बाबत माहिती दिली जाते. आपल्‍या समोर कोण आहे आणि मागे कोण आहे, याची इंत्‍थभूत माहिती त्‍यांच्‍याकडे असते.''
>"जर कुणी‍ शिखरावर पोहोचले तर तत्‍काळ ही बातमी इतर सर्व गिर्हारोहकांना कळते. "
> "पण, राठोड दाम्‍पत्‍याने 23 मे रोजी शिखर सर केले तरीही त्‍यांची इतर कुण्‍याच गिर्हारोहकांना नव्‍हती. 5 जून रोजी त्‍यांना स्‍वत:ला या बाबत का सांगावे लागले,'', असा प्रश्‍नसुद्धा त्‍यांनी उपस्‍थ‍ित केला.
> "त्‍यांनी पुरावा म्‍हणून दाखवलेल्‍या फोटोंमध्‍ये वेगवेगळे कपडे आणि बूट दिसत आहेत.
मोहिमेवर असताना त्‍यांना ते कुठे आणि कसे बदले? "
> " जर केवळ दिनेश यांचा फोटोच बारकाईने पाहिला तर शिखरावर गेल्‍यानंतर त्‍यांनी लाल आणि काळ्या रंगाचे लांब जॅकेट घातलेले दिसते. दरम्‍यान, अन्‍य एका फोटोत त्‍यांच्‍या जॅकेटचा आणि बुटाचा रंग वेगळा दिसत आहे. "
> " एव्‍हरेस्टवर चढताना त्‍यांनी हे कपडे कसे बदलले'', असा प्रश्‍नसुद्धा त्‍यांनी उपस्‍थ‍ित केला.
> ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी सर केल्‍याचा दावा केलेला आहे, त्‍याचीही चौकशी व्‍हावी, असे त्‍यांनी म्‍हटले.

कोण आहेत तारकेश्वरी आणि दिनेश
महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे वर्ष 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघेही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. दोघे 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...