आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Poet, Novelist And Critic Bhalchandra Nemade Decleared Gyanpeeth Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिक भालचंद्र नेमाडेंना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्य क्षेत्रात जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, या वर्षात नेमाडेंना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले आहेत.
हिंदू, जरीला, झूल, हूल, बिढार, कोसला यासारख्या दर्जेदार कलाकृती त्यांनी प्रेक्षकांसमोर आणल्या. त्यांच्या हिंदू या कांदबरीने तर अनेकांच्या मनावर गारूड केले आहे. माझ्या लेखनाची दखल घेतली याचा मला आनंद झाला एवढीच माफक अशी प्रतिक्रिया नेमाडे यांनी या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिली.
खान्देशात 1938 साली जन्मलेल्या नेमाडेंनी त्यांची पहिली कादंबरी कोसला (1963 साली) ही वयाच्या 25 व्या वर्षी लिहली. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणा-या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार, जरीला व झूल या 'चांगदेव पाटील' या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंब-या लिहिल्या. त्यानंतर नेमाडे यांनी तब्बल 35 वर्ष विवेचन करून लिहलेल्या 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीने तर लोकांच्या मनावर गारूडच केले. नेमाडेंना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार मिळाला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. नेमाडे यांच्या लेखनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली याचा मला मनापासून आनंद झाला. माझ्या मित्राचे अभिनंदन आणि शुभेच्छा अशा शब्दात कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनीही नेमाडेंना पुरस्कार मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. नेमाडेंचे लेखन चाकोरीबाहेरचे असल्याने अनेक तरूणांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे या पुरस्कारासाठी ते सर्वात योग्य लेखक आहेत असे राजन खान यांनी सांगितले.
पुढे वाचा, काय आहे ज्ञानपीठ पुरस्कार व त्याला का आहे महत्त्व...
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी साहित्याचा सन्मान- मुख्यमंत्री...