आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाची तयारी पूर्ण: पिंपरी-चिंचवडमधील रस्ते, कमानी पोस्टर्सनी साहित्यमय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मकर संक्रातीच्या गोड सणासोबत मायमराठी भाषेतील साहित्यगोडी निर्माण करणार्‍या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी आता सज्ज झाली आहे. पिपरीमधील हिंदुस्थान ऍण्टिबायोटिक्स कंपनीच्या 40 एकराच्या मैदानावर आता संमेलनाचा भव्य मंडप मोठ्या दिमाखात उभा राहिला असून साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी तयार झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कमानी आणि भव्य फलकातून आणि कमानी उभारुन त्यावरुन संमेलनाचे जाहीर निमंत्रणही देण्यात आले आहे.
12 ते 15 हजार साहित्य रसिकांना सामावून घेणारा मुख्य मांडव, आतमध्ये 120 फूट लांबीचे तितकेच भव्य व्यासपीठ, त्यावर 200 एलईडी दिवे आणि मंडपात 1200 एलईडी दिवे यांचा शुभ झगमगाट साहित्याची पूजा करणार्‍या सारस्वतांना आनंद देणारा ठरेल. तसेच शेजारील अडीच हजार आसन क्षमतेचे दोन उपमंडप आणि 400 ग्रंथगाळे असणारे सर्व सोयींनी सुसज्ज असणारे दोन भव्य मंडप उभारले आहेत. याचबरोबर पाच ते सहा हजार वाहने लावण्यासाठी संमेलनाच्या लगतच असणार्‍या 100 एकरच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दुचाकी, चारचाकी आणि बसेस लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही जागही अपुरी पडली तर डॉ. पी. डी. पाटील विद्यापीठातील इंजिनियरिंगचा वाहनतळही संमेलनास उपस्थित राहाणार्‍या रसिकांसाठी खुला करण्यात येत आहे.
संमेलन स्थळावरील मुख्य मंडपाला कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात आले असून उपमंडपाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यासपीठ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून देण्यात आले आहे. सभा मंडपात संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे भव्य बोधचिन्हही रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृतीही उपस्थितांचे लक्ष वेधत आहेत. 1200 चौरस फुटांचा भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मंडपात 13 मोठ्या आकारातील एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था चोख व कडक-
संमेलनस्थळी 200 खासगी बाऊन्सर्स (सुरक्षारक्षक), पोलिस उपायुक्त, एक सहाय्यक पोलिस आयुक्त, 7 पोलिस निरिक्षक, 35 पोलिस उपनिरीक्षक आणि 250 पुरुष व 50 महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत.
मायमराठीची सेवा करण्याची संधी मिळाली- पीडी पाटील
मायमराठी आणि मराठी साहित्याची सेवा करण्याची ही सुसंधी मला मिळाली असल्याने संमेलनात येणार्‍यांची कोणतीही गैरसोय होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. मराठी मायबोलीत सर्वच एक आहेत ही समानता आम्ही या संमेलनातून दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले.
पुढे पाहा, संमेलनस्थळावरील तयारीची छायाचित्रे...