आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबनीस, आता तुम्हीच पुढाकार घेऊन वाद मिटवा- स्वागताध्यक्षांनी टोचले कान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनातन संस्थेने दिलेल्या \'मॉर्निंग वॉकला जा\' या आवाहनाचा स्वीकार करत नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी काही मीटर चालून मॉर्निंग वॉक घेतला. मात्र, प्रसिद्धीसाठीचा एक नवा मार्ग, अशा शब्दांत या वॉकविषयीची प्रतिक्रिया उमटली. - Divya Marathi
सनातन संस्थेने दिलेल्या \'मॉर्निंग वॉकला जा\' या आवाहनाचा स्वीकार करत नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी काही मीटर चालून मॉर्निंग वॉक घेतला. मात्र, प्रसिद्धीसाठीचा एक नवा मार्ग, अशा शब्दांत या वॉकविषयीची प्रतिक्रिया उमटली.
पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी, नियोजित अध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद, आता नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीच पुढाकार घेऊन मिटवावा,' असे जाहीर आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सोमवारी केले. आयुष्यात एकदाच संमेलनाध्यक्ष होता येते हे लक्षात ठेवा, असे सांगत सबनीसांचे कान टोचले.

पिंपरी येथे संमेलनस्थळाची पाहणी करण्यासाठी आमंत्रित पत्रकारांशी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सबनीस यांच्या पंतप्रधानांवरील वक्तव्यामुळेच सध्या वाद सुरू आहे. यामुळे अनेक गैरसमजही पसरले आहेत. असे असताना भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षांना आपण शांत राहा, असे कसे म्हणायचे. मी स्वत:च सबनीस यांना आता भेटणार आहे. या प्रकरणात त्यांचीच प्रमुख भूमिका आहे. त्यांनी दोन पावले मागे घेतली नाहीत तर संमेलन सुरू असताना राजकीय कार्यकर्ते संमेलनस्थळाबाहेर आंदोलन करणार आहेत. असे वातावरण संमेलनादरम्यान राहू नये, याची सबनीसांनीच काळजी घ्यावी. पंतप्रधान हे सर्वोच्च सन्मानाचे पद आहे. त्या पदावरील व्यक्तीविषयी आक्षेपार्ह विधाने करणे गैर आहे. त्या पदाचा मान त्यांना द्यायलाच हवा. त्यामुळे सबनीस यांनीच पुढे येऊन हा वाद मिटवावा असे पाटील यांनी आवाहन केले.
आम्ही गेल्या काही दिवस मनापासून संमेलनाची तयारी करत आहोत. अनेक मान्यवर लेखकांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत. जे संमेलनाला येत नाहीत, असे लेखकही यंदा संमेलनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे अनेक अर्थाने हे संमेलन गाजणार आहे. अशा संमेलनाला कसलेही गालबोट लागता कामा नये. संमेलनाला काही गालबोट लागले तर संमेलनाला येणा-या तरुणाईत काय संदेश जाईल, याचाही विचार व्हायला पाहिजे. संमेलन हा आमच्या एकट्याचा सोहळा नाही, सर्वांचा आहे. स्वागताध्यक्ष या नात्याने आम्ही आमची जबाबदारी ओळखतो, त्याप्रमाणे सबनीस यांनीही स्वतःची जबाबदारी ओळखावी. पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा सर्वांनीच आदर राखायला हवा, असे सांगत पाटील यांनी सबनीसांचे कान टोचले व दोन पावले मागे या असा सूचका इशारा दिला.
वादच जास्त, संमेलन रद्द करा- विठ्ठल वाघ यांची मागणी, वाचा पुढे...