पुणे - पिंपरी- चिंचवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पंचरंगी होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या उमेदवारांना नाव मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबर होती. त्यामुळे बुधवारी चंद्रकुमार नलगे आणि डॉ. रवींद्र शोभणे यांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात कवी विठ्ठल वाघ, श्रीपाल सबनीस, शरणकुमार लिंबाळे, प्रकाशक अरुण जाखडे आणि श्रीनिवास वारुंजीकर हे पाच जण उरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली. त्यांचे भवितव्य १०७० मतदार ६ नोव्हेंबर रोजी ठरवणार आहे.