पुणे - घुमानला होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे गाढे व्यासंगी डॉ. अशोक कामत तसेच प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांची नावे सुचवणारे अर्ज गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत दाखल झाले. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत.
डॉ. अशोक कामत यांचे नाव डॉ. मंगेश कश्यप यांनी सुचवले असून अनुमोदक म्हणून डॉ. श्यामा घोणसे, प्रतिमा इंगोले, केतकी मोडक, प्रदीप निफाडकर आणि दीपक करंदीकर यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. तर भारत सासणे यांचे नाव सुचवणारा अर्जही महाराष्ट्र साहित्य परिषदेत गुरुवारी सायंकाळी दाखल झाला. डॉ. वीणा देव यांनी सासणे यांचे नाव सुचवले आहे. तर यांनी त्यांच्या नावाला विद्या बाळ, मुकुंद अनगळ, विलास खोले, संजय भास्कर जोशी आणि महावीर जोंधळे यांनी अनुमोदन दिले आहे. मसापच्या वतीने कार्यवाह महेंद्र मुंजाळ यांनी हे अर्ज स्वीकारले.