आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sammelan News In Marathi, Ramchandra Dekhane, Divya Marathi

अध्यक्षपदासाठी देखणेही चर्चेत, साहित्य संमेलनाची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचेही नाव आता चर्चेत आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच चार इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत.

88 वे मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घूमान येथे आयोजित करण्यात येणार आहे. घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी मानली जाते. त्यामुळे या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याची अभ्यासक व्यक्ती असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक आहोत, असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, भारत सासणे व डॉ. अशोक कामत यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

कीर्तन-वारकरी परंपरेतील अध्यक्ष असावा : डॉ. देखणे
डॉ. देखणे म्हणाले, मलाही अनेक स्नेहींनी अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा सल्ला दिला आहे. मी आषाढीवारीसाठी गेलो होतो. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात नेमके काय सुरू आहे, यापासून महिनाभर दूर होतो. मात्र, लवकरच मी लेखक मित्र, प्रकाशक मंडळींशी संवाद साधणार आहे. संतसाहित्याची अभ्यासक व्यक्ती अध्यक्षपदी असावी, हे संयुक्तिक ठरेल. त्यातही तो कीर्तन परंपरेतील असावा, असे सूचक विधानही त्यांनी केले.