आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sammelan : Only Two Crores Books Sold

मराठी साहित्य संमेलन: नियोजनशून्यतेचा फटका; केवळ दोन कोटींची ग्रंथविक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेव नगरी /सासवड - रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असला तरी संयोजकांच्या नियोजनशून्यतेपायी साहित्य संमेलनात ग्रंथविक्रीच्या उलाढालीला मात्र फटका बसला. पुस्तकांची 272 दालने असूनही तीन दिवसांत फक्त दोन कोटींच्या आसपास ग्रंथविक्री झाल्याचा अंदाज प्रकाशन संस्थांनी व्यक्त केला आहे.
प्रकाशन संस्था व विक्रेत्यांसाठी 10 बाय 12 आकाराचे स्टॉल देण्याचे संयोजकांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र 9 बाय 9 आकाराचेच लहान स्टॉल देण्यात आले. त्यामुळे अनेकांना आपली पुस्तके ठेवण्यात अडचणी आल्याचे प्रकाशकांनी सांगितले. पद्मगंधा, राजहंस, मेहता, मौज, काँटिनेंटल, ग्रंथाली, रोहन, संस्कृती, मनोविकास अशा मान्यवर प्रकाशनांची दालने या ठिकाणी होती. परंतु त्यांना कोणत्याही सोयीसुविधा देण्यात आल्या नव्हत्या. ग्रंथनगरीत साध्या चटयाही व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळे धुळीचा त्रास होत असल्याचे प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले. साहित्यविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर म्हणाले. चिपळूणच्या संमेलनातही एक कोटीच्या आतच विक्री झाली होती.
अत्र्यांच्या साहित्यालाच जागा नाही : आचार्य अत्रे यांचे जन्मगाव सासवडमध्ये होणा-या या संमेलनात अत्र्यांची पुस्तके प्रकाशित करणा-या परचुरे प्रकाशनाने दोन स्टॉल बुक करूनही जागा मिळाली नाही. अगदी मागच्या बाजूला त्यांना स्टॉल देण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी ते नाकारले.