परदेशात
आपल्या देशाची नाळ जोडण्याचे काम जोडण्याचे काम मराठी माणूस करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येकाचाच ऊर अभिमानाने भरून येतो. असेच काम करत असलेले विदेशातील भारताचे उच्चायुक्त, लेखक ज्ञानेश्वर मुळे आणि देशोदेशीचे पंतप्रधान- राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार, सध्या जगातील पाणीप्रश्नावर काम करत असलेले लेखक संदीप वासलेकर यांनी परदेशात आलेले अनुभव, गमती, त्यांचे लिखाण आदी मुद्द्यांवर साहित्य संमेलनातील रसिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी या दोघांना बोलते केले.
गाडगीळ: संपन्न राष्ट्रांमध्ये शेतकऱ्याच्या या मुलाला काय वाटतं?
मुळे : आजराजदूतांची प्रतिमा विदेशात आनंद घेणारे अशी आहे; पण नंतर लक्षात आलं की या प्रक्रियेत जी माणसे येतात त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणं हे आपलं काम आहे. त्यातून मी नवीन उपक्रम राबवत गेलो की, शासन आणि जनता एकत्र येईल, असं काम करत गेलो.
गाडगीळ: इंग्रजी साहित्य हा विषय का घ्यावा वाटला?
मुळे : हा विषय घेतल्यामुळे आपण चांगलं इंग्रजी बोलू शकतो असं वाटलं. मी विद्यापीठात पहिला आलो तरी मला चांगलं इंग्रजी येत नव्हतं. माझ्याशी कोणी इंग्रजी बोललं की मी आधी त्याचं मनात मराठी करून मग इंग्रजीत उत्तर देत असे. सध्या लहान मूल भाषा शिकतो तर आपण मोठे आहोत, त्यामुळे न्यूनगंड काढून टाकावा.
गाडगीळ: जगाचं आकर्षण कसं?
वासलेकर : भारतातराजकीय आणि वैचारिक लोकशाही वृद्धिंगत झाल्याने छोट्या माणसाला मोठं करण्याचं धाडस झालं. म्हणून मीही मोठा झालो, यात नवीन काहीच नाही. डोंबिवलीत राहताना विमानाचा आवाज आला की मी धावत जायचो. तेव्हाच विमान आपल्यात काही तरी नातं आहे, असे संकेत मिळत होते.
गाडगीळ: लिहावंसं का वाटलं?
वासलेकर : हृदयविकारातूनमी वाचलो. तेव्हा मित्र म्हणाला, तुला एवढ्या देशांचा अनुभव आहे. ते शब्दांतून उतरव, त्याने युवकांना प्रेरणा मिळेल. म्हणून मग मी 'एका दिशेचा शोध' हे पुस्तक लिहिले.
गाडगीळ: मुळे, तुम्हाला बोलून आनंद मिळतो की लिहून?
मुळे : दोन्हींमुळे मात्र लिखाणाला माझी आई जबाबदार आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गाव सोडला, तेव्हा आई म्हणाली की, 'परत कधी येणार? मी शिक्षण, नोरीनिमित्त मात्र दूर दूर जात राहिलो. वाटलं की, 'आईशी खोटं बोललो, ' मग विचार आला की मी काय करतो हे आईला कळावं. ते कळण्यासाठी मी 'माती पंखं' आणि 'आकाश' लिहायला सुरुवात केली.
'मराठीतून शिकले तरी मोठे होता येते'
आम्हा दोघांचेही शिक्षण मराठीतून झाले, तरीही आम्ही जगभरात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने आमचे काही अडले नाही. आजच्या पालकांनी मुलांना इंग्रजी शिक्षणाचा हट्ट धरता मराठीतून शिक्षण द्यावे आणि आता तरी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असा सूर ज्ञानेश्वर मुळे आणि संदीप वासलेकर या दोघांच्याही बोलण्यातून उमटला.