आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाला उपस्थित राहणार नाही, सबनिसांनी माफी मागावी- खासदार साबळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी खासदार अमर साबळे यांना निमंत्रण दिले. यानंतर या दोघांत अर्धा तास चर्चा झाली. - Divya Marathi
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी खासदार अमर साबळे यांना निमंत्रण दिले. यानंतर या दोघांत अर्धा तास चर्चा झाली.
पुणे- पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नियोजित साहित्य संमेलानाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाळा भाजपचे खासदार अमर साबळे यांनी दिला आहे. तसेच सबनीस अध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलानालाही उपस्थित राहणार नसल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये 15 जानेवारीपासून सुरु होणा-या 89 व्या साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील हे आज सकाळी निगडीतील खासदार अमर साबळे यांच्या निवासस्थानी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. यावेळी खासदार साबळे आणि डॉ. पाटील यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी साबळे यांनी वरील भूमिका मांडली.
खासदार साबळे म्हणाले, भारतीय संस्कृतीप्रमाणे संमेलानाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचे मी स्वागत करून संमेलानाचे निमंत्रण स्वीकारतो. परंतू संमेलानाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अवमानकारक भाषा वापरल्यामुळे संमेलनाला उपस्थित राहणार नाही. गेल्या 30 वर्षाच्या काळात केंद्रात कोणत्याही नेतृत्वाला एक हाती बहुमत मिळाले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मागील 20 महिन्यात एकही दिवस सुटी घेतली नाही. दिवसातील 16 ते 18 तास जनतेच्या विकासासाठी झटत आहेत. जात पात न पाहता सबका साथ सबका विकास होण्यासाठी पंतप्रधान मोदी कार्यरत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी श्रद्धांजलीची भाषा वापरणे कोणत्याही सभ्य संस्कृतीत बसणार नाही. म्हणून श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या अवमानकारक वक्त्यव्याची जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिकात्मक आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे खासदार साबळे यांनी यावेळी सांगितले.
साबळे पुढे म्हणाले, साहित्य संमेलान हे या देशातील साहित्य संस्कृतीचे व प्रज्ञावंताचे पवित्र व्यासपीठ आहे. साहित्य चळवळ ही आदर्श चळवळ आहे. या आदर्श चळवळीतील त्या व्यासपीठावर असहिष्णू वृत्तीच्या अपवित्र व्यक्तीचे पाऊल पडू नये व ते व्यासपीठ कलंकित होऊ नये. सबनीस सारखी व्यक्ती त्या व्यासपीठावर उपस्थित राहणे म्हणजे याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात जे अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्याला मान्यता दिल्यासारखे होईल. त्यामुळे सबनीस यांनी माफी मागितली पाहिजे. त्यामुळे सबनीस माफी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरूच राहील. सबनीस यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याने ते अध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलानालाही उपस्थित राहणार नसल्याचे खासदार साबळे यांनी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांना सांगितले.
पुढे आणखी पाहा व वाचा...
बातम्या आणखी आहेत...