आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातला भेट देण्यात मराठी पर्यटक पाऊल पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पर्यटकांना गुजरातमध्ये आकर्षित करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नेमणा-या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातला पर्यटक म्हणून भेट देणा-या मंडळींमध्ये मराठी पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे. 2012 - 13 या आर्थिक वर्षात गुजरातला भेट देणा-या मराठी पर्यटकांची संख्या सुमारे साडेअठरा लाख इतकी असून हे प्रमाण 35 टक्के आहे.


टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरातचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी ही माहिती दिली. गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक संजय कौल या वेळी उपस्थित होते. मराठी बांधवांनी पर्यटनाच्या क्षेत्रातला शेजारधर्म उत्तम प्रकारे जोपासला आहे, असे सांगून पटेल म्हणाले, गुजरातमध्ये पर्यटनातील वैविध्य आहे. समुद्रकिनारे, जंगले नैसर्गिक परिसंस्था, पुराणवस्तू, शिल्पे, धार्मिक स्थळे, बौद्ध लेणी, गांधी वास्तू, वाळवंट, थंड हवेची ठिकाणे, वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक रूढी-परंपरा असे अनेक पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाचे चित्र झपाट्याने विकसित होत आहे.


मराठी पर्यटक प्रामुख्याने अहमदाबाद, द्वारका, सुरत, बडोदा, राजकोट, गांधीनगर, अंबाजी, पालिताणा, भूज आणि वापी या ठिकाणांना भेटी देतात. गुजरातबाहेर राहणारे गुजराती बांधव सर्वाधिक
संख्येने महाराष्ट्रातच आहेत. त्यांची संख्या सुमारे 40 लाख आहेत. त्यापैकी 23 लाख गुजराती बांधव महाराष्ट्रात आहेत. हे प्रमाण 70 टक्के इतके मोठे आहे.


बच्चन यांची नवी कँपेन - खुशबू गुजरात की
०मान्सून महोत्सव तीन ऑगस्टपासून सापुतारा येथे
०सप्टेंबरमध्ये सौराष्ट्रात तारनेतर यात्रा
०नवरात्री उत्सव ऑक्टोबरमध्ये
०रण उत्सव डिसेंबरमध्ये
०नववर्षाच्या प्रारंभी पतंग उत्सव