आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्येही यंदा साजरा होणार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदाचा 70 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा साजरा करण्याचा ठराव मंजूर केला आहे. ध्वजारोहण, हुतात्म्यांना आदरांजली, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, मराठवाडा गौरव पुरस्कार असे कार्यक्रम यावेळी घेण्यात येतील.
 
राज्यातील अन्य भागात जाणिवेचा प्रयत्न
मराठवाड्याला स्वातंत्र्यानंतर तब्बल एक वर्षे एक महिना दोन दिवस उशिरा स्वातंत्र्य मिळाले. याची जाणीव राज्यातील अन्य भागात व्हावी, नव्या पिढीला या घटनेमागची दुर्दम्य आकांक्षा लक्षात आणून द्यावी हा यामागील हेतू असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले. गेली काही वर्षे यासाठी ते प्रयत्न करत होते.
बातम्या आणखी आहेत...