आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या संगणक अभियंता विवाहितेची पुण्यात अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वाॅशिंग मशीन आणि टीव्ही घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, अशी सातत्याने मागणी होत असल्याने संगणक अभियंता असलेल्या जळगावच्या विवाहितेने वाकड येथे इमारतीच्या ११  व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. चेतल हेमकर्ण पवार (२५, मु.रा.जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती हेमकर्ण पाटील (२७) व सासरे अासाराम पाटील (दाेघे रा.वाकड, पुणे) यांना पाेलिसांनी अटक केली अाहे. 

याबाबत चेतलची आई भारती पाटील (४५, रा. अमळनेर, जि. जळगाव) यांनी हिंजवडी पाेलिसांत तक्रार दिली आहे. चेतल हिने इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत एमई पदव्युत्तर पदवी संपादन केली होती, तर  तिचा पती हेमकर्ण हादेखील संगणक अभियंता असून ताे पुण्यातील  एका कंपनीत चांगल्या पगाराची नाेकरी करताे. लग्नानंतर काही दिवसांतच पती,  सासू  आणि सासऱ्यांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...