आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर अत्याचार करून जीवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील थरारक प्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - माहेरी आलेल्या विवाहितेवर बलात्कार करून जिवंत जाळल्याचा निर्घृण प्रकार खोरोची (ता. इंदापूर) येथे रविवारी दुपारी घडला. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून नराधम फरार आहे.

खोरोची येथील उज्‍जवला (वय 18) हिचा दोन वर्षापूर्वी काटेवाडी (ता. बारामती) येथील कैलास शहाजी ढमे यांच्याशी विवाह झाला होता. दोन महिन्यांपासून ती माहेरी होती. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास गावातील धनंजय बोराटे याने उज्ज्वलास दूध डेअरीजवळ निर्जन ठिकाणी गाठले व तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडिता वडिलांच्या घरी आली, तेव्हा घरी कोणीच नव्हते. या प्रकाराची वाच्यता झाली तर खैर नाही, या भीतीने धनंजय पाठोपाठ तिच्या घरी आला. अंगावर रॉकेल ओतून उज्ज्वलास पेटवून दिले आणि कडी लावून निघून गेला. शेजार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात हलवले. उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली.