आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या, वडीलांचा सासरच्‍या मंडळीवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती राजेश सिंगसोबत विवाहिता संगीता. - Divya Marathi
पती राजेश सिंगसोबत विवाहिता संगीता.
पुणे- पिंपरीत एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही.
 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संत तुकाराम नगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी संगीताच्या वडिल राम नरेश प्रसाद यांनी सासरचे मंडळी या आत्महत्येमागे असल्याचा आरोप केला आहे. सांगीता यांना वारंवार मारहाण होत होती, तिला नेहमीच सासरचा जाच होता, असे त्‍यांनी सांगितले आहे. संगीता आणि राजेश यांचा विवाह हा १० वर्षापूर्वी झाला होता. त्यांना दोन मुल आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...
 
 
बातम्या आणखी आहेत...