आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षांचा संसार...पतीने घेतला चारित्र्यावर संशय, विवाहीतेची पुण्यात आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चारित्र्यावरुन संशय घेऊन पतीसह सासरच्या लोकांकडून होणार्‍या छळाला कंटाळून वाकड येथे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्पना ऊर्फ निशा सिद्धार्थ गायकवाड (वय-30 रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) असे विवाहितेचे नाव आहे. तिने राहत्या घरी विष सेवन करून जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी कल्पनाचा पती आणि सासरच्या चार व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

आई वडिलांना भेटू नको... शेजाऱ्यांशी बोलू नको...

सूत्रांनुसार, सिद्धार्थ कल्पनावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातूनच तिच्या सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला होता. आई वडिलांना भेटू नको, शेजाऱ्यांशी बोलू नको असे सारखे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. सासरच्या मंडळींच्या या छळाला कंटाळून कल्पनाने अखेर टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

 

घरातील सततच्या टोचून बोलण्याला कंटाळून सोमवारी (27नोव्हेंबर) हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर 2 दिवस कल्पनावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिची मंगळवारी प्राणज्योत मालवली.

 

कल्पना आणि सिद्धार्थ यांच्या संसाराला 10 वर्षे पूर्ण झाली होती. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. पोलिसांनी तपास करीत पती सिद्धार्थ सोमनाथ गायकवाड, सोमनाथ गायकवाड (सासरा), शाम सोमनाथ गायकवाड (दीर) ,घरातील दोन महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पीडीतेची आई सुशीला भोसले ( जाफ्राबाद, जालना) यांनी तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...