आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- ताथवडे येथे इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून विवाहित महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आज (मंगळवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार चेतल असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन चेतल (वय- 25, रा.ताथवडे) ‍हिने आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. चेतल हिने दुपारी सुरक्षारक्षकाकडून चावी घेऊन टेरिस गाठले होते. नंतर तिने बाराव्या मजल्यावरून अचानक उडी घेतली. जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...