आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; पिंपरी स्टेशनवरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी रेल्वे स्टेशनवर एका 26 वर्षीय विवाहितेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी आठ वाजून दहा मिनिटांला घडली.
स्वाती निहाल वेलानी (रा.पाचपीर चौक, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर एक्स्प्रेस  (गाडी नंबर 12940) समोर उडी घेऊन स्वाती वेलानी या महिलेने आपली जीवनयात्रा संपवली. ती स्वारगेट येथे नोकरीस होती. नेहमी प्रमाणे आज देखील नोकरीसाठी स्वारगेटला जाण्यासाठी पिंपरी रेल्वे स्टेशनवर आली होती. मात्र तिने अचानक रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला जबर मार लागला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

या आत्महत्येमागील कारण आद्यप अस्पष्ट आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस एम.एच.गायकवाड हे करीत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचा व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...