आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mass Reciting Of Ganesh Atharvashirsh In Pune Dadusheth Halwai Ganesh Temple

PHOTOS: दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर परिसर सामुहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्राच्‍या लाडक्‍या गणरायाचे मोठ्या उत्‍साहात घरोघरी आगमन झाले. गणपती बाप्‍पाच्‍या आगमनानंतर सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्‍यातही उत्‍साहाचे वातावरण असून आज प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराचा परिसर श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला. हजारो महिलांनी सामुहिकरित्‍या अ‍थर्वशीष पठण केले.

सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्‍या दिवशी दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरातील मूर्तीला आज रत्‍नजडीत अलंकारांनी मढविण्‍यात आले होते. दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हे पुणेकरांचे श्रद्घास्‍थान आहे. सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्‍या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा सामुहिक अथर्वशीर्ष पठणाची सचित्र झलक....