आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maval Loksabha Election, Laxman Jagtap Is On Backfoot

राज ठाकरेंच्याच भूमिकेमुळे मावळात लक्ष्मण जगताप अडचणीत, विरोधक मुद्दा तापविणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली पाहिजेत. किती काळ आपण बकाल शहरे वसविणार आहोत अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील शेकापचे व मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांची मोठी गोची झाली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जगताप यांच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याने आधीच अडचणीत असलेले लक्ष्मण जगताप आता राज यांच्या भूमिकेमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे मावळमधील उमेदवार राहुल नार्वेकर यांनी तत्काळ राज यांचा मुद्दा उचलत वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात येत्या गुरुवारी मतदान होत आहे. मतदानाला केवळ 4-5 दिवस उरले असताना शहरातील नागरिकांपुढे कोणता मुद्दा घेऊन जायचे अशा विवंचनेत जगताप अडकले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार नार्वेकर यांनी तत्काळ राज यांचा मुद्दा उचलत वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची भूमिका राष्ट्रवादीची पहिल्यापासून आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांनी अनधिकृत बांधकामे वेळेत नियमित न झाल्याने राष्ट्रवादीची साथ सोडली होती. आता राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर ते मनसेचा पाठिंबा नाकारणार आहेत का याचे उत्तर द्वावे असे खुले आव्हान जगतापांना दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी अनधिकृत बांधकामे नियमित करावीत यासाठी अनेक वेळा आंदोलने करीत स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्यानंतर बारणेसुद्धा जगतापांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा, राहुल नार्वेकरांचे जगतापांना आव्हान...