आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळात वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात? बारणे, जगताप, नार्वेकरांचा विजयाचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झाल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 16 वाढ झाली आहे. ही वाढ कोणाच्या पारड्यात जाणार व कोणाला पूरक ठरणार व कोणाला मारक ठरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, मावळातील प्रमुख तीन उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवासेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, शेकाप पुरस्कृत लक्ष्मण जगताप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी आपलाच विजय असे वक्तव्य केल्याने सामान्य मतदारांच्याही उत्सुकतेत भर पडली आहे. भाजप-शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल असे म्हणत सट्टेबाज व बेटिंग करणा-या पंटरनी मात्र श्रीरंग बारणे यांच्यावर सर्वाधिक पैसे लावले आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पाडले असून 60.16 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांची संख्या 19 लाख 52 हजार 208 इतकी आहे. त्यापैकी सुमारे 11 लाख 74 हजार 464 म्हणजेच 60.16 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 46 हजार 989 आहे व महिला मतदारांची संख्या 5 लाख 27 हजार 475 आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी विधानसभा मतदार संघात 48.83 टक्के, चिंचवड विधानसभा मतदार संघात 55.23 टक्के, मावळ विधानसभा मतदार संघात 67.84 टक्के, कर्जत विधानसभा मतदार संघात 68.40 टक्के, उरण विधानसभा मतदार संघात 72.01 टक्के, तर पनवेल विधानसभा मतदार संघात 58.53 टक्के मतदान झाल्याची निवडणूक अधिका-यांनी माहिती दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 2009 साली 45 टक्के मतदान झाले होते. यंदा यात सुमारे 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. याबाबत शिवसेनेचे उमेदवार बारणे यांनी म्हटले आहे की, यंदा मावळ लोकसभा मतदार संघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात सुरू असणा-या बदलाच्या वा-यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केले. वाढलेल्या मतदानाचा फायदा आपल्याच होणार असून आपण शंभर टक्के विजयी होणार असा विश्वास आहे. संपूर्ण मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह होता त्यामुळेच उत्स्फूर्तपणे मतदान केले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पैशाचे अमिष दाखवून मत खरेदी करण्याचा तडाखा लावला होता. मात्र, मतदारांवर या अमिषाचा परिणाम झालेला नाही. मतदारांनी सत्ताबदल व परिवर्तन समोर ठेवून मतदान केले. दरम्यान, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे उत्साही असूनही ब-याच ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. मात्र, तरी देखील वाढलेली टक्केवारी आशादायक आहे. गेल्या विधानसभेला पिंपळे-गुरवमध्ये 80 टक्के मतदान झाले होते. यावेळी तिथले मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केल्यामुळे तेथे फक्त 40 व 42 टक्के मतदान झाले आहे. याचा परिणाम आणि वाढलेल्या टक्केवारीचा फायदा मलाच होणार असून मी शंभर टक्के विजयी होणार आहे, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे वाचा, जगताप, नार्वेकर यांचाही विजयाचा दावा...