आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळात राष्ट्रवादीची नाचक्की: जगतापांपाठोपाठ वाघेरे, खांडगेंचाही उमेदवारी घेण्यास नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारण्यास आमदार लक्ष्मण जगताप यांनी नकार दिल्यानंतर आता इतर इच्छुक संजोग वाघेरे आणि गणेश खांडगे यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात नाचक्की होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेनेने चिंचवडमधील श्रीरंग बारणेंची उमेदवारी जाहीर करून एकदाचा विषय संपविला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीने यंदा येथून विजय खेचून आणायचाच हा चंग बांधला होता. मात्र याला पहिला सुरुंग लावला तो गेल्या वेळेसची पराभूत उमेदवार आझम पानसरे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्याविरोधात काम केले. पक्षाशी गद्दारी करणा-या जगतापांना राष्ट्रवादी जर तिकीट देणार असेल तर अशा पक्षात काम करणे यापुढे मला जमणार नाही असे सांगत पानसरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून मोठ्या पवारांनी जगतापांना आवरण्याची सूचना केली. मात्र पक्षाने तोपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, पानसरे यांनी बारणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सेनेतील नेत्यांना निरोप पोहचवला. त्यामुळे जगताप यांच्या पायाखालची वाळू सरकली. एकवेळ ते बारणेंना उमेदवारी मिळाली तर लढू अशी भूमिका घेत होते. मात्र पक्षातून त्यांचे नाव पुढे येण्याचे संकेत मिळताच त्यांनी अनधिकृत घरांचा प्रश्न सरकारने सोडविला नाही असे सांगत आघाडीची उमेदवारी स्वीकारणार नसल्याची ताठर भूमिका घेतली. याबाबत जगताप यांनी शरद पवारांशी चर्चा केली. मात्र, मागील वेळी पक्षाच्या उमेदवाराला पाडल्याने पानसरेंसारखा ज्येष्ठ नेता सोडून गेल्याने पवार आधीच जगताप यांच्यावर नाराज होते. त्यातच त्यांनी ताठर भूमिका घेताच पवारांनी थेट त्यांचे तिकीट कापले.
लक्ष्मण जगतापांनीच राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी, यासाठी एका गटाचा प्रयत्न, वाचा पुढे....