आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभाग अन् खड्डेताईंचा लावला प्रेम विवाह; प्रशासनविरुद्ध स्थानिकांचे अनोखे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड - मावळ मधील कामशेत मध्ये चक्क चि.बांधकाम विभाग आणि चि.सौ.का. रस्त्यावरील खड्डेताईंचा मोठ्या थाटात प्रेम विवाह पार पडला आहे. हे लग्न पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. कामशेत गावात खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बांधकाम विभागाचे सततचे दुर्लक्ष आणि दुरावस्थेला कंटाळून स्थानिकांनीच हे अनोखे आंदोलन केले आहे. बांधकाम प्रशासनाचे खड्ड्यांवर प्रेम असल्याने ते बुजवले जात नाहीत असे नागरिकांनी म्हटले आहे.
 
 
बँड बाजा वाजवत वधु चि. सौ.का. रस्त्याची खड्डेताई आणि वर चि. बांधकाम विभाग यांची कामशेत गावात मोठ्या थाटात वरात काढण्यात आली. ट्रॅक्टर मधून काढलेल्या या वरातीत सर्व गावातील लहान थोर मंडळी कुतूहलाने पाहात होते. ठीक बारा वाजता दोघांनाही शिवाजी चौकात बोहल्यावर चढवत भडजींनी मंगल अष्टके सुरू केली आणि शेवटची अष्टका झाल्यानंतर मोठ्या आवाजात फटाक्यांची आतषबाजी करत लग्न सोहळा पार पडला. यावेळी खडी, वाळू, सिमेंट मुरूम अश्या नुसतीच लुडबुड करणारी छोटी मंडळी देखील उपस्थित होती. वधुकडील मंडळींनी सेल्फी देखील काढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...