आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस परतला, २४ तासही अाशादायक; हवामान खात्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) सक्रिय झाला आहे. पुढच्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि विदर्भात मान्सून जोरदारपणे सक्रिय झाला आहे. पुढच्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. याचाही फायदा पाऊसमान वाढण्यास होईल. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वदूर पावसाने पुनरागमन झाले आहे. कोकण आणि सह्याद्री डोंगररांगांच्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. कोकणात सर्वत्र पन्नास मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भातही पाऊस वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसास सुरुवात झाली आहे.