आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीएच्या रिक्त जागांसाठी ‘सीईटी’ घेण्याचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एमबीएच्या रिक्त जागांसाठी ‘सीईटी’ घेण्याचा असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए इन्स्टिट्यूटचा (अम्मी) मार्ग मोकळा झाला आहे. प्रवेशाचे वेळापत्रकही न्यायालयाने निश्चित करून दिले आहे. त्यानुसार ‘एमबीए’ची सीईटी 3 ऑगस्ट रोजी तर ‘एमसीए’ची 2 ऑगस्ट रोजी
होणार आहे.
‘अम्मी’मार्फत गेल्या आठ वर्षांपासून रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जात होती, परंतु यंदा प्रवेश नियंत्रण समितीने त्यास मनाई केली होती. त्याला असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या निकालामुळे ‘अम्मी’शी संलग्न राज्यातील 353 व्यवस्थापन संस्थांना दिलासा मिळाला आहे. तसेच ज्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेली सीईटी देता आली नव्हती त्यांना प्रवेशाची संधी मिळेल आणि एमबीएच्या रिक्त जागाही भरल्या जातील, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडेकर यांनी सांगितले.

प्रवेशाचे वेळापत्रक
20 ते 31 जुलै : अर्ज विक्री व ऑनलाइन स्वीकृती
3 ऑगस्ट : सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)
10 ऑगस्ट : सीईटीचा निकाल
14 ऑगस्ट : प्रवेशासाठी अंतिम मुदत
संकेतस्थळ : एमबीएसाठी, एमसीएसाठी www.mahaammi.com & www.mamimaha.com