आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लग्नाच्या बासुंदीमुळे 10 पाहुण्यांना विषबाधा, 4 महिलांसह 3 चिमुरडेही बाधित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लग्नात बासुंदी खाल्ल्यामुळे 10जणांना विषबाधा झाली. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या किवळे येथील एका लग्न समारंभात घडली. उलट्याचा त्रास झाल्याने सर्वाना आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चार महिलांसह तीन चिमुरडे बाधित आहे. यापैकी एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.किर्तीकुमार पाटील यांनी दिली आहे.

 

सूत्रांनुसार, रावेतजवळ किवळे हद्दीत काल (रविवार) कांबळे -बनसोडे विवाह समारंभ पार पडला.  या सोहळ्यात 800 पाहुण्यांसाठी अन्नपूर्णा केटरर्स या आचारीने जेवण तयार केले होते. दुपारी अकराच्या सुमारास शेवटची पंगत झाली. या पंगतीत जेवण केलेल्या 10 जणांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या- जुलाबाचा त्रास सुरु झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी तिघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर इतरांनावर उपचार सुरु आहे. किरण अंकुश कांबळे या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...