आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या मुलाला मारहाण; चौघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या मुलाला शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपावरून चतु:शृंगी पोलिसांनी चार जणांना अटक केली. बोरवणकर यांचा मुलगा अंकुर बोरवणकर (20) हा त्याच्या नातेवाइकासह मंगळवारी रात्री बाणेर परिसरातील हॉटेल ग्रीन पार्क येथून बाहेर पडत होता. तो दुचाकीवर असताना कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. ‘आम्हाला साइड का देत नाही, ओव्हरटेक करू देत नाही’ असे म्हणत अंकुरला शिवीगाळ केली. या चौघांनी अंकुरला मारहाणीचीही धमकी दिली अंकुरने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली तसेच कारचा क्रमांकही सांगितला. त्यावरून पोलिसांनी चौघांनाही अटक केली. डी. आर. मेघावत (55), बी. डब्ल्यू. घनावत (19), मोत्या रमल मेघावत (30) आणि किशोर लच्छा राणावत (19) अशी आरोपींची नावे आहेत.