आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती स्पेशल: भेटा छत्रपती शिवरायांच्या 14 व्या पिढीला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजी महाराज यांची 14 वी पिढी असलेली नयनतारा व वीरप्रताप सिंह. - Divya Marathi
शिवाजी महाराज यांची 14 वी पिढी असलेली नयनतारा व वीरप्रताप सिंह.
पुणे- महाराष्ट्राचे व तमाम मराठी बांधवांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती झाली. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वाबाबत आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, आजच्या दिनी आम्ही त्यांच्या लहानग्या असलेल्या 14 व्या पिढीबाबत तुम्हाला माहिती सांगणार आहोत. शिवाजी महाराजांची गादी याच पुढच्या पिढीला हाकायची आहे. कोण आहेत हे पाहूया आपण....
ही आहे 14 व्या पिढीचे सर्वात लहान सदस्य-
- शिवाजी महाराजांच्या या युवा पिढीच्या सर्वात छोट्या सदस्यांत आहे 5 वर्षाची नयनतारा राजे आणि 8 वर्षाचे वीरप्रताप सिंह.
- नयनतारा व वीरप्रताप हे खासदार उद्यनराजे भोसले यांची मुले आहेत. जे सातारा येथील राष्ट्रवादीचे खासदार आहेत.
- या दोघांची आई दमयंति राजे या सुद्धा राजघराणे परिवारातून आलेल्या आहेत.
नयनतारा शिकतेय तलवार चालवायला-
- उदयनराजे यांची छोटी व एकुलती एक मुलगी नयनतारा आपल्या आईसोबत पुण्यात राहते.
-गेल्या वर्षी नवरात्रीत प्रथमच प्रतापगडावर या शस्त्रासोबत प्रात्यक्षिक करताना नयनतारा आढळून आली होती.
- यावेळी नयनताराने आपल्या घरातील लोकांसमवेत भवानी माता मंदिरात पूजा केली होती.
- नयनताराच्या हस्ते मंदिरात दीड किलो चांदीचे डुमरू देवीला अर्पण केले होते.
- राजघराण्यातील नयनताराला पाहण्यासाठी यावेळी हजारो लोकांनी गर्दी केली होती
- किल्ल्यावर तलवार चालवण्याचे तंत्र आत्मसात करतानाची नयनताराची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाली होती.
- या कलेत नयनतारा परंपरागत व्हावी यासाठी खास प्रशिक्षक नेमण्यात आला आहे.
वीरप्रताप घेतोय वडिलांकडून राजकारणाचे धडे-
- उदयन राजे यांना एक 8 वर्षाचा मुलगा आहे. ज्याचे नाव वीरप्रताप सिंह असून तो चेन्नईतील एका शाळेत शिकतो.
- सुट्टीच्या काळात तो सातारा व पुण्यात येतो.
- शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात वीरप्रताप वडिलांसमवेत आवर्जून सहभागी होतो.
- वीरप्रतापने आतापासून राजकारणाचे धडे गिरवण्याचे काम सुरु केले आहे. तो वडिलांसमवेत राजकीय सभात दिसून येतो.
शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत उदयनराजे भोसले-

साता-याचे खासदार असलेले उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज आहेत.
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी 5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
- 2009 मध्ये 4 लाखाच्या घरात मते घेऊन त्यांनी विजय मिळवला होता.
- महागड्या गाड्याचे शौकिन असलेले असलेल्या उदयनराजेंकडे अनेक लग्झरी कार आणि बाईक्स आहेत.
- सामान्य लोकांत उदयनराजे जबरदस्त लोकप्रिय आहेत. साता-यात ते नेहमीच स्कूटर आणि बाईक्स चालवताना दिसतात.
- उदयनराजे लोकप्रिय असले तरी ते नेहमीच वाद ओढवून घेतात. शरद पवारांसह अजित पवारांना आव्हान देण्यापासून त्रास देणारे अधिकारी असो की अन्याय करणारा एखादा नेता, गुंड असो उदयनराजे त्याला शैलीतून सरळ करतात असा अनुभव आहे.
पुढे पाहा, स्लाईड्समध्ये पाहा, शिवाजी महाराजांच्या युवा वंशजाची काही PHOTOS...