पुण्याच्या फॅशन डिझायनरचे / पुण्याच्या फॅशन डिझायनरचे लोक झाले चाहते; 800 सीसी बाईकवरून निघाली जगभ्रमंतीला

800 सीसी बाईकवरून जगभ्रमंतीला निघाली ही पुण्याची फॅशन डिझायनर; लोक झाले फॅन.800 सीसी बाईकवरून जगभ्रमंतीला निघाली ही पुण्याची फॅशन डिझायनर; लोक झाले फॅन.800 सीसी बाईकवरून जगभ्रमंतीला निघाली ही पुण्याची फॅशन डिझायनर; लोक झाले फॅन.डॉ. मारलकडे 800 सीसीची BMW GS बाईक आहे. बाईकचे वजन 370 किलो आहे. ती सध्या याच बाईकवरून 7 महाखंडावरील 45 देशांच्या सफरीवर निघाली आहे. यादरम्यान तिने जवळपास एक लाख किलोमीटर अंतर प्रवास करण्‍याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Oct 26,2017 01:06:00 PM IST
पुणे- 800 सीसी बाईकवरून जगभ्रमंतीला निघालेल्या पुण्यातील एक फॅशन डिझायनर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. डॉ.मारल याजरलू (35) असे तिचे नाव असून ती इराणी आहे. परंतु ती मागील 15 वर्षांपासून पुण्यात राहते.

डॉ. मारलकडे 800 सीसीची BMW GS बाईक आहे. बाईकचे वजन 370 किलो आहे. ती सध्या याच बाईकवरून 7 महाखंडावरील 45 देशांच्या सफरीवर निघाली आहे. यादरम्यान तिने जवळपास एक लाख किलोमीटर अंतर प्रवास करण्‍याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. महिलांना नवी ओळख निर्माण करून देण्याचा तिचा या जगभ्रमंतीमागे उद्देश आहे.

मारलला आवडतात फुलपाखरं...
जगभ्रमंतीला निघालेल्या मारल हिचे लाखो लोक फॅन झाले आहेत. मात्र, मारल ही रंगीत फुलपाखखांची दिवानी आहे. त्यामुळे तिने बाईकवर विविध फुलपाखरे चिटकवली आहेत.

6 वर्षांपासून बायकर...
डॉ. मारल हिने मार्केटिंगमध्ये एमबीए आणि पीएचडी केली आहे. 11 वर्षांपासून त्या पंचशील रियल्‍टीमध्ये रीटेल-मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. ती मागील 6 वर्षांपासून बाईक चालवत आहेत. मारल हिला आई-वडील आणि दोन भाऊ नेहमी प्रोत्साहन देतात.

इराणमध्ये मोटारसायकल चालवणार्‍या महिलांविरोधात फतवा...
दरम्यान, गेल्या वर्षी इराणमध्ये मोटारसायकल चालवणार्‍या महिलांविरोधात फतवा जारी करण्‍यात आला होता. डॉ. मारल हिने सांगितले की, ती इराणमध्ये जाऊन हा फतवा जारी करणार्‍या तेथील नेत्यांची भेट घेणार आहे. जारी करण्यात आलेल्या फतव्यावर पुन्हा पुर्नविचार करावा, अशी ती नेत्यांना विनंती करणार आहे.

या 'ग्‍लोबल टूर' अंतर्गत डॉ. याजरलू यांनी अंटारटिकामध्ये बर्फावर देखील बाईक चालवली. याप्रवासात त्यांच्यासोबत एक फोटोग्राफरही आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. जगभ्रमंतीला निघालेल्या डॉ. मारल याजरलू यांचे निवडक फोटो...
X
COMMENT