आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा महाराष्ट्रातील सर्वात \'पॉवरफूल\' नेत्याच्या पत्नीला, पाहा PHOTOS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) 45 वा वाढदिवस आहे. महाराष्ट्रात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. फडणवीस वयाच्या केवळ 27 व्या वर्षी महापौर बनले होते. तसेच त्यावेळी ते देशातील सर्वात तरूण महापौर ठरले होते. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्या पत्नी अमृता यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला राज्यातील सर्वात कादतवान नेत्यांच्या पत्नींबाबत माहिती देणार आहोत.
डॉक्टरची मुलगी आहे अमृता-
अमृता यांचे वडील नागपूरमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉ. शरद रानडे व डॉ. चारू रानडे यांची कन्या असलेल्या अमृता 2006 साली देवेंद्रसोबत विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी देवेंद्र सलग दुस-यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहचले होते. त्यांचा नागपूरात शाही विवाह पार पडला होता. देवेंद्र यांचे मित्र शैलेश जोगळेकर सांगतात की, देवेंद्र आणि आमृता यांची भेट माझ्या घरी झाली होती. त्यावेळी दोघांनी एक तास चर्चा केली आणि विवाहाचा निर्णय पक्का केला. आता या दोघांच्या लग्नाला 9 वर्षे झाली आहेत. त्यांना दिविजा नावाची 8 वर्षाची एक मुलगी आहे.
अमृताची देवेंद्रला भक्कम साथ-
एक नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास संघर्षपूर्ण होता. त्यांच्या यशामागे अमृताचा मोठा सहभाग आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो किंवा त्यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी असताना ते बहुतांश वेळ घराबाहेर राहत असत. तरीही बॅंकेतील नोकरी करून त्यांनी घर सांभाळले. व्यावसायाने बॅंकर असलेल्या अमृता सध्या AXIS बॅकेत व्हाईस प्रेसिंडेट पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत त्या नागपूरमध्ये कार्यरत होत्या. मात्र, पाच-सहा महिन्यापूर्वी त्या मुंबईत शिफ्ट झाल्या आहेत. बॅंकेनेही त्यांची बदली नागपूरहून मुंबईत केली आहे. घर-नोकरी अशी तारेवरची कसरत करूनही पती देवेंद्रसोबत त्या राजकीय व्यासपीठावर हजेरी लावतात.
कॅन्सरचे हॉस्पिटल बांधायचे आहे अमृताला-

अमृता या पेशाने डॉक्टर नसल्या तरी त्यांना रूग्णासाठी कॅन्सरचे हॉस्पिटल बांधण्याचे आहे. डॉक्टरची मुलगी असलेली अमृता डॉक्टर बनू शकली नसली तरी हॉस्पिटल बांधून रूग्णांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा आहे. नागपूरमधील संघ परिवाराची संस्था डॉ. आबाजी थत्ते सेवा संस्थेच्या माध्यमातून वर्धा रोडवरील जामठा येथे हॉस्पिटल उभारले जाणार आहे.
पुढे पाहा, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता यांचे निवडक photos....