पुणे- सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे ते सातारा, एकत्र प्रवास केला होता. त्यामुळे उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील काही महिन्यांपासून ते पवार साहेब व राष्ट्रवादीपासून फटकून वागत होते. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र, राजेंनी पवारांसोबत प्रवास करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 15 व्या पिढीतील सर्वात लहान सदस्याविषयी खास माहिती घेऊन आलो आहे.
नयनतारा भोसले 15 व्या पिढीतील सर्वात लहान सदस्यसाताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराजांचे 14 वे वंशज आहेत. त्यांची कन्या राजे नयनतारा भोसले ही आता भोसले घराण्याच्या 15 व्या पिढीतील सदस्य आहेत. गेल्या वर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भोसले कुटुंबियांसह तिने प्रतापगडावरील कुळदैवत भवानी मातेचे पूजन करून चिमुकल्या हातांनी तलवारबाजीचे कसबही दाखवले होते. यावेळी ती पहिल्यांदा माध्यमांसमोर आली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शिवाजी महाराजांची बांधलेले मंदिर आजही सुस्थितीत...