आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: लिफ्टच्या बहाण्याने हिंजवडीत अभियंत्याला दीड लाखाला लुटले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हिंजवडीत नोकरीला असलेल्या एका अभियंत्याला लिफ्टच्या बहाण्याने दीड लाख रूपयाला लुटल्याची घटना हिंजवडीत उघडकीस आली आहे. ऑफिसमधून सायंकाळी सातनंतर सुटल्यानंतर रस्त्यावर बसच्या वाट पाहत उभे असलेल्या रवीशंकर गोपाळ (34) या अभियत्याला कार कारचालकाने लिफ्ट देऊ केली. त्यावेळी कारमध्ये चालकासह आणखी एक जण होता. गोपाल यांनीही ट्राफिकमधून सुटका करून घेण्यासाठी लवकरच घरी परतण्यासाठी क्षणात कारमध्ये बसले.
मात्र, पुढे एक किलोमीटरवर वाकडमधील कस्पटेवस्तीवर कार आली असता कारमध्ये आणखी दोघे जण बसले. त्यानंतर या चौघांनी गोपाल यांचे गाडीतच हात व डोळे बांधले. तसेच त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन पिन नंबर सांगण्यास सांगितले. याद्वारे कस्पटे वस्तीजवळीलच एका एटीएममध्ये गेले व गोपाळ यांच्या बॅक खात्यातील पैसे काढले. त्यानंतर त्यांनी गोपाळ यांना मारूंजी, पिरूंगुट रोडने चार-पाच तास फिरवले. वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत असतानाही त्यांनी काही खरेदीही केली. एका दिवसात एटीएममधून 50-60 हजार ( प्रत्येक बॅंकेची वेगवेगळी रक्कम) काढता येतात. त्यामुळे या लुटारूंनी गोपाळ यांना रात्री बारापर्यंत फिरवले. रात्रीच्या 12 नंतर लागलीच आणखी एकदा पैसे काढून घेतले. असे एकून एटीएम वापरून सुमारे दीड लाख रूपये काढले. रात्री साडेबाराच्या सुमारास गोपाळ यांना जगताप डेअरीजवळ सोडून दिले. गोपाळ हे पिंपळे निलखमधील उच्चाभ्रू विशालनगर परिसरात राहतात.
दुस-या दिवशी गोपाळ यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, गोपाळ यांनी कारचा नंबर पाहिला नव्हता. तसेच त्यांचे डोळे बांधल्याने कोणत्या ठिकाणाहून एटीएममधून पैसे काढले व कोठे कोठे फिरवले याचा काहीच अंदाज आला नाही. पोलिसांना अद्याप या लुटारूंचा शोध लागला नाही. मात्र, पोलिस हिंजवडी, वाकड, डांगे चौक व माण-मारूजी भागांतील एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत.
बातम्या आणखी आहेत...