आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात गतिमंद महिलेवर महापालिकेच्‍या रुग्‍णालयात सामुहिक बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात एका गतिमंद महिलेवर महापालिकेच्‍याच रुग्‍णालयात सामुहिक बलात्‍कार केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. महापालिकेचा एक कर्मचारी आणि खासगी सुरक्षारक्षकाने रुग्‍णालयाच्‍या लिफ्टमध्‍येच हे दुष्‍कृत्‍य केले. दोघांनाही अटक करण्‍यात आली असून 4 दिवसांच्‍या पोलिस कोठडीत पाठविण्‍यात आले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, पीडित महिला भोसरी येथील एका पुनर्वसन केंद्रात राहते. तिचे वय सुमारे 30 वर्षांचे आहे. तिला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे सुरक्षारक्षक म्‍हणून कामावर असलेला प्रमोद मांडेकर आणि महापालिकेचा कर्मचारी शैलेश जाधव यांनी तिला लिफ्टमध्‍ये नेले आणि तिच्‍यावर आळीपाळीने बलात्‍कार केला. दुस-या दिवशी पीडित महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. तिने खाणखुणा करुन घडलेल्‍या अत्‍याचाराची माहिती पुनर्वसन अधिका-यांना दिली. तिच्‍या माहितीनंतर अधिका-यांचे धाबेच दणाणले. त्‍यांनी तत्‍काळ या प्रकाराची माहिती महापालिका आयुक्तांना कळविली. त्‍यानंतर पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली. शनिवारी रात्री दोघांना अटक करण्‍यात आली.