आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार या वर्षी कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सन्मानाचे वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी दिली.

यापूर्वी एस. एम. जोशी, कामरेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंह, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुल बजाज, डॉ. कोटा हरिनारायण यांनाही या पुरस्काराने सम्मानित करण्‍यात होते. स्थापत्य अभियंता असणारे ई. श्रीधरन यांचा दिल्ली मेट्रो अंमलबजावणीतही सिंहाचा वाटा आहे. ई.श्रीधरन यांना फ्रान्समधील 'नाईट ऑफ दी लिजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सम्मानित केले होते.