आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Middle Man Given Caste Certificats Are Bogus, Criminal Action Take

दलालांकडून घेतलेले जात प्रमाणपत्र बोगस,फौजदारी कारवाई करण्याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काही व्यक्तींनी मध्यस्थी, दलाली करणा-यांकडून गैरमार्गाने मिळवलेले जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र बोगस असण्याची शक्यता अधिक असल्याचे काही वर्षांमध्ये आढळून आले आहे. बनावट प्रमाणपत्राबद्दलच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्याने अशा बनावट प्रमाणपत्रधारकांविरुद्ध मोहीम उघडली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक डी. आर. परिहार हे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक म्हणून काम पाहतात. या माहितीला दुजोरा देत परिहार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, की अलीकडच्या काळात जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्र घेतलेल्या लोकांनी प्रमाणपत्रांची वैधता तपासून घ्यावी. प्रमाणपत्रांच्या वैधतेबद्दलचे अर्ज समितीकडून लवकर निकाली काढले जातील. प्रमाणपत्राचा बनावटपणा भविष्यात केव्हाही उघड झाल्यास भारतीय दंड संहितेच्या सन 2001 अधिनियम व त्याअंतर्गत नियम 2012 नुसार फौजदारी कारवाईची तरतूद आहे. बनावट प्रमाणपत्र देण्यास मदत करणारा व घेणारा या दोघांनाही या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा सश्रम कारावास व आर्थिक दंड होऊ शकतो.
जातव्यवहार ‘खुला’
‘सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध जात पडताळणी समित्यांकडून दिलेल्या वैधता प्रमाणपत्र प्रकरणांची माहिती लवकरच ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर टाकली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या चार वर्षांची माहिती जाहीर होईल. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातून कोणकोणत्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र कोणत्या पडताळणी समितीकडून गेल्या चार वर्षांत दिले गेले व प्रमाणपत्राचे स्वरूप, तपशील इत्यादी सर्व माहिती संकेतस्थळावर पाहता येणार आहे. सर्व माहिती खुली झाल्यामुळेही अनेक बनावट प्रकरणे उघडकीस येण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास डॉ. परिहार यांनी व्यक्त केला.
खोट्या जातीचा अट्टहास का?
* स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आदी ठिकाणच्या विविध निवडणुकांमधल्या राखीव जागांवरून निवडणूक लढण्यासाठी.
* सरकारी शिष्यवृत्त्या, अनुदाने, योजना, शैक्षणिक सवलती व आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी.
* सरकारी नोक-या व पदोन्नतीच्या संधी साधण्यासाठी.