आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Military Officers Critise On One Rank, One Pension

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘वन रँक वन पेन्शन’वरून निवृत्त लष्करी अधिका-यांचा बेजबाबदारपणे ‘गोळीबार’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लष्करी अधिका-यांनी जवानांच्या हक्कांसाठी जरूर संघर्ष करावा. मात्र स्वार्थासाठी राजकीय भूमिका घेणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. अधिका-यांकडून ही अपेक्षा नाही, असा घरचा आहेर निवृत्त विंग कमांडर अभय जोशी यांनी दिला. ‘वन रँक वन पेन्शन’साठी ( ओआरओपी) निवृत्त सैनिक गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाच्या भूमिकेत आहेत. याबद्दल जोशी बोलत होते.

ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे पुत्र असलेले अभय पुण्यात वास्तव्यास असतात. वायुसेनेतल्या २० वर्षांच्या सेवेनंतर डोळ्याच्या अपघातामुळे त्यांनी निवृत्ती घेतली अाहे. जोशी म्हणाले, की ‘ओआरओपी’च्या मुद्द्यावरून निवृत्त अधिकारी दिशाभूल करत आहेत. साधारणत: २४ व्या वर्षी कमिशन मिळाल्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षापर्यंत अधिका-यांना ३० वर्षे सेवा बजावता येते. एवढा काळ सेवा बजावलेल्या अधिका-यांना सध्या मिळणारे किमान पेन्शन ५५ हजार रुपये इतके आहे. मात्र हे अधिकारी हा आकडा कमी करून सांगतात. पदानुसार पेन्शनचा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो, हेही लक्षात घ्यायला हवे. ५४ व्या वर्षी निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या कौटुंबिक गरजा लक्षात घेता सध्या मिळणारे निवृत्तिवेतन खूपच पुरेसे आहे, असे मत जाेशींनी व्यक्त केले.

संघटनांचे मत देशहिताचे नाही : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्त सैनिकांच्या संघटनेने राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केली. माजी सैनिकांच्या संघटनांनी मोदींची भलामण किंवा त्यांच्यावर टीका करणे याेग्य नाही. ‘ओआरओपी’च्या मुद्द्यावरून शौर्यपदके परत करण्याचा अशोभनीय प्रकारही काहींनी केला. निवृत्त सैनिकांची ही कृत्ये निषेधार्ह आहेत,’ असे जोशी म्हणाले.

दिशाभूल करणारा दावा
लष्करातून सन १९९६ पूर्वी निवृत्त झालेल्या अधिका-यांना फारच कमी पेन्शन मिळत असल्याची निवृत्त सैनिकांची तक्रार आहे. नव्या आणि जुन्या निवृत्तांच्या पेन्शनमध्ये ५३ टक्के तफावत असल्याचे सांगितले जाते, याबद्दल विचारले असता जोशी म्हणाले, ‘या तक्रारीत तथ्य नाही. मी स्वत: सन १९८८ मध्ये निवृत्त झालो. मला आज दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळते. "एक पद एक निवृत्तिवेतन' ही कल्पना जगात कुठेही लागू नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

स्वार्थासाठी लढू नका
लष्करी अधिकारीवर्गाच्या तुलनेत जवान लवकर निवृत्त होतात. त्यांना मिळणारे वेतनही तुलनेने कमी असते. एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनने सुरुवातीला फक्त जवानांसाठीच ‘ओआरओपी’ची मागणी पुढे केली होती. ती योग्यही आहे. मात्र नंतर अधिका-यांनी स्वत:साठीही हीच मागणी रेटायला सुरवात केली. याचे अजिबात समर्थन करता येत नाही. अधिका-यांनी जवानांच्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे. स्वार्थासाठी लढणे त्यांना शोभत नाही. – अभय जोशी, निवृत्त विंग कमांडर