आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांची संख्या घटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशभरातील जनसामान्यांची ‘नोटाबंदी’मुळे झालेली अडचण आळंदी येथील कार्तिकी यात्रेतही प्रतिबिंबित झाली आहे. दरवर्षी सुमारे सहा लाख वारकऱ्यांच्या आगमनाने फुलून जाणारा इंद्रायणीकाठ यंदा काहीसा सुनासुना दिसत आहे. वारकऱ्यांची आणि दिंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे निरीक्षण आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनीही नोंदवले आहे.

आळंदी येथे शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीचा महासोहळा आहे. यानिमित्त संपूर्ण आठवडाभर आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होतात, ही परंपरा आहे. या सोहळ्यासाठी अलंकापुरीत दरवर्षी सुमारे सहा लाख वारकरी दर्शनासाठी येतात, अशी माहिती विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी दिली. यंदा मात्र वारकऱ्यांची संख्या, दिंड्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही कार्तिकी एकादशीचा सोहळा नेहमीप्रमाणेच उत्साहात पार पडणार आहे,’ असे ते म्हणाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२१ व्या संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत सध्या सुरू आहे. माउलींच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून येणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांनाही फटका
आळंदी आणि परिसरात छोटी दुकाने थाटून किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नोटाबंदीचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. भाविकांच्या घटलेल्या संख्येमुळे विक्रीवर थेट परिणाम झाल्याचे अनेकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...