आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नाही तर मराठा समाजाकडूनच- रामदास आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काेपर्डीच्या घटनेत दलित अाराेपींना पाेलिसांसमाेर हजर करण्यात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अांबेडकरी कार्यकर्त्यांनी अाराेपींना कधीही पाठिंबा िदला नाही. मात्र, या घटनेनंतर मराठा समाजाचे विविध ठिकाणी माेर्चे निघत आहेत. अातापर्यंत अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नाही तर मराठा समाजाकडूनच झाला अाहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हाेत असेल तर त्यात दुरुस्त्या सुचवा. मात्र, या कायद्याविराेधात कितीही अांदाेलने झाली तरी ताे रद्द केला जाणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात अायाेजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. अाठवले म्हणाले, देशभरात दरवर्षी दलितांवर ४६ हजार अत्याचाराच्या घटना घडतात. काेणत्या विचारधारेचे सरकार सत्तेवर म्हणून हे अत्याचार हाेत नाहीत, तर काही जणांच्या डाेक्यात जातीयवाद असल्यानेच असे प्रकार घडतात. दलितांवर अत्याचार झाल्यानंतर अॅट्रॉसिटी कायदा लावलाच पाहिजे. महाराष्ट्राचे राजकारण मराठा-दलित एकत्र अाले तरच चांगल्या प्रकारे पुढे जाऊन समाजातील दरी कमी हाेण्यास मदत हाेईल. मराठा समाजाप्रमाणेच पटेल, जाट, ब्राह्मण यांनाही अारक्षण मिळावे यासाठी संसदेत कायदा संमत हाेणे गरजेचे अाहे. अहमदनगर येथे सात अाॅक्टाेबर राेजी दलित-मराठा एेक्य परिषदेचे अायाेजन करण्यात अाल्याचे आठवले म्हणाले.

आंतरजातीय विवाहांना प्राेत्साहन दिले पाहिजे
जातीच्या नावावरून समाजात माेठी दरी निर्माण हाेत आहे. ही दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्राेत्साहन िदले पाहिजे. अशा प्रकारे लग्न करणाऱ्या जाेडप्यातील एकास नाेकरी देण्याची याेजना केंद्र शासनाने जाहीर केल्यास विवाहांच्या संख्येत वाढ हाेईल. सामाजिक मंत्रालयातर्फे जातीबाह्य विवाह करणाऱ्यांना अडीच लाख रुपये मदत िदली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...