आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या या स्टायलिश मुलीने केले दबंग, डॅशिंग IPS सोबत लग्न, पाहा फोटोज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती शिवदीप लांडे यांच्यासह ममता... - Divya Marathi
पती शिवदीप लांडे यांच्यासह ममता...
पुणे- बिहार पोलिस दलात कार्यकरत असलेले व दबंग, सिंघम, डॅशिंग IPS अशी ओळख मिळवलेले व तरूणाईत कमालीचे लोकप्रिय असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिपदीप लांडे यांना अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र केडर दिले आहे. गृहमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, लांडे यांना महाराष्ट्रात तीन वर्षासाठी पाठवले गेले आहे. आपल्याला माहित असेलच की, शिपदीप लांडे हे मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह दोन वर्षापूर्वी शिवदीप यांच्यासमवेत झाला होता.
मार्च महिन्यात शिवदीप लांडे यांनी आपले सासरे व मंत्री विजय शिवतारे यांच्या विनंतीनुसारच, आपल्याला महाराष्ट्र केडर मिळावे यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अर्ज केला होता. त्यानंतर गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडे यांच्या अर्जाची दखल घेत, राज्याचे पोलिस महासंचालकांना अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यात लांडे यांना स्वगृही केडर मिळाले आहे.
मंत्र्यांच्या स्टायलिश मुलीशी केला विवाह-
- पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह दोन वर्षापूर्वी बिहार पोलिस दलात कार्यरत असलेले व दबंग, सिंघम अशी ख्याती मिळवलेले विदर्भीय पुत्र आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी झाला.
- ममता लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. ममताचे बालपण साधारण व मुंबईतील चाळीत गेले असले तरी पुढे शिवतारे यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली व आपली आर्थिक प्रगती केली.
- पुढे शरद पवारांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला मात्र राष्ट्रवादीत काही राहिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- शिवसेनेत गेल्यावर ते आमदार झाले व आता मंत्रीही बनले आहेत. शिवतारे यांना दोन मुले व एक मुलगी आहे.
- दोन्ही मुले बांधकाम व्यवसायत आहेत. तर, मुलगी ममताने आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी विवाह केला आहे.
- बिहारमध्ये कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिपदीप लांडे यांनी आपले सासरे मंत्री शिवतारे यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र पोलिस दलात रूजू होण्याबाबत केंद्रीय व राज्याच्या गृहमंत्रालयाकडे अर्ज केला.
- त्यानंतरच सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या. त्यामुळे शिवदीप लांडे महाराष्ट्र पोलिस दलाचे केडर आता मिळाले आहे.
नितीश, लालू-पासवान या त्रिकुटानेही केले कौतूक-
- आपल्या दबंग कामगिरीमुळे शिवदीप हे बिहारमधील युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनले.
- यादरम्यान, दबंग, सिंघम अशी ओळख निर्माण केली. तरूण-तरूणी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळतात.
- त्यांच्या दबंगगिरीने गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पाटण्याचे पोलिस अधीक्षक बनविले.
- त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या. त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली.
- लांडे याच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केलेले आहे.
मुंबईत जुळली होती मने-
- इकडे महाराष्ट्रातही लांडे यांच्या पराक्रमाच्या बातम्या झळकत होत्या. त्यामुळे मराठी तरूणीही लांडे यांच्या व्यक्तीमत्त्वावर भाळल्या होत्या.
- इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी व यूपीएससी करण्यासाठी लांडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांचे फ्रेंड सर्कल आहे.
- त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत लांडे मुंबईत येत असत. तेथेच शिपदीपची शिवतारे यांची कन्या ममता हिची ओळख झाली.
- मैत्री झाल्यानंतर शिवदीप व ममताने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- 2 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांचा विवाह मुंबईत पार पडला. आता या दोघांच्या संसारात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे आपण पाहूया मंत्र्यांची मुलगी व आयपीएसची पत्नी असलेल्या स्टायलिश ममताचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...